कुलाब्यातील मेट्रो हाऊसला लागलेली आग पुन्हा भडकली

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2016 11:02 PM IST

कुलाब्यातील मेट्रो हाऊसला लागलेली आग पुन्हा भडकली

sadsaday

02 जून : दक्षिण मुंबईतल्या कुलाब्यातील रिगल थिएटरजवळ असलेल्या मेट्रो हाऊस इमारतीला लागलेली भीषण आग पुन्हा भडकली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या आणि 18 टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पाण्याचे टँकर न पोहोचल्यानं अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी येत आहेत.

सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 3 तास उलटूनही अजून आग धुमसतेच आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ही आग लागली असून, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कुलाब्यातील मेट्रो हाऊस परिसरातील रिगल सिनेमाजवळ ही इमारत आहे. तसेच, या परिसरातच प्रसिद्ध लिओपोल्ड कॅफे असून, त्याच्या बाजूलाच आमदार निवासही आहे.

मेट्रो हाऊस इमारत रिकामी करून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी 2 अँम्बुलन्सही दाखल झाल्या आहेत. कुलाबा हा परिसर रहदारीचा असून, आगीनंतर इथली गर्दी आणखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी अतिदक्षतेचा उपाय म्हणून रिगल जवळ नाकाबंदी आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त केला आहे.

दरम्यान, आग विझवताना निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे आता भाजप आमदार राज पुरोहित यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2016 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...