सनातनच्या साधकांनीच दाभोलकरांची हत्या केली, खेतान यांचा दावा

सनातनच्या साधकांनीच दाभोलकरांची हत्या केली, खेतान यांचा दावा

  • Share this:

01 जून : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येमागे सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीचा हात असल्याचा दावा आपचे नेते आशिष खेतान यांनी केलाय. सनातन आणि हिंदू जनजागृती समितीच्या साधकांनीच दाभोलकरांची हत्या केल्याचा दावाही खेतान यांनी केलाय. खेतान यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडालीये.ashish_khetan

अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला तीन वर्ष पूर्ण होत आहे तरीही मारेकरांचा शोध लागलेला नाही. आपचे नेते आशिष खेतान यांनी या प्रकरणी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीवर बोट ठेवलंय. खेतान यांनी ट्विट केलंय. यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्था आणि तिच्याशी संलग्न असलेली हिंदू जनजागरण समितीचा हात आहे. तपास यंत्रणांनी छडा लावला आहे.

एवढंच नाहीतर तपास यंत्रणांनी मारेकर्‍यांची ओळख सुद्धा पटवली आहे असा दावा खेतान यांनी केलाय. तसंच सनातन संस्थेनं महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. या संस्थांवर बंदी घालावी अशी तपास यंत्रणांची मागणी होती. पण काँग्रेस सरकार ही कारवाई करू शकलं नाही असा खुलासाही खेतान यांनी केलाय. खेतान यांनी याआधीही या प्रकरणी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यावर आरोप केला होता. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांचा शोध लागावा म्हणून प्लँचेटचा वापर केला होता असा दावा खेतान यांनी केला होता. विशेष म्हणजे दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातनचा हात असल्याचा संशय आधीपासून व्यक्त केला जात आहे. आता पुन्हा एकदा खेतान यांनी सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 1, 2016, 1:45 PM IST

ताज्या बातम्या