आर्थर रोड जेलमध्ये दोन गटात हाणामारी, 6 कैदी जखमी

  • Share this:

arthur_road_jail30 मे : मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये दोन गटामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडलीये. विनोद नायर आणि अरमान खान यांच्यात गँगवॉर झालं आहे. या गँगवॉरमध्ये 6 कैदी जखमी झाले आहेत. त्यातले 4 जण गंभीर आहेत अशी माहिती मिळतेय.

आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या मुस्ताफ डोसा आणि पप्या गँगच्या गुंडांमध्ये ही हाणामारी झालीये. या गुंडांनी तुरुंगातच भांडी आणि चमचे यांचा शस्त्रासाऱखा वापर केल्याची माहिती समोर आलीये. या हाणामारीत 6 कैदी जखमी झाले आहे. त्यापैकी 4 कैद्यांवर जेजे मध्ये उपचार सुरू आहे. या चौघांची प्रकृती गंभीर आहे. एन.एम. जोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गँगवार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे. जेल महासंचालक स्वाती साठे या आर्थर रोड तुरुंगात येऊन गेल्या. एन एम जोशी पोलीस स्टेशन प्रकरणाचा अधिक तपास करतंय. प्रथमदर्शनी तात्कालीन वादातून हाणामारी झाल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 30, 2016, 9:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading