'जलयुक्त शिवार'चं यश, 22 वर्षांनंतर भरली नदी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 30, 2016 08:37 PM IST

'जलयुक्त शिवार'चं यश, 22 वर्षांनंतर भरली नदी

उस्मानाबाद - 30 मे : फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला मोठ्या प्रमाणात यश मिळतंय. उस्मानाबाद जिल्यात 2 दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पाऊस झाला आणि अगदी थोड्या पावसानेच नदी नाल्यात पाणी साठल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळतंय.osmanabad3

उमरगा तालुक्यतील बेनीतुरा नदी ही गेल्या 22 वर्षांपासून आपलं अस्तित्वचं हरवून बसली होती. पण शासन आणि मुरूम गावातील गावकरी यांनी लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदी खोली करणाचं काम हाती घेतलं. त्या कामाचं फळ आज गावकर्‍यांना मिळालंय. 22 वर्षांपासून कधीच न भरलेली नदी आज या मान्सूनपूर्व झालेल्या थोड्याशा पावसानं भरून गेली आहे. तर आता या नदीतील पाणी पाहून गावकरी आनंदीत झाले आहे. त्यामुळे पुढील काळात आणखी जलयुक्तची कामं करणार असल्याचं गावकरी आणि लोकप्रतिनिधी सांगत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2016 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...