नाशिकमध्ये कपालेश्वर मंदिरात आंदोलनादरम्यान तृप्ती देसाईंना दुखापत

नाशिकमध्ये कपालेश्वर मंदिरात आंदोलनादरम्यान तृप्ती देसाईंना दुखापत

  • Share this:

नाशिक - 26 मे : भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांना आज पुन्हा एकदा गाभार्‍यात दर्शन घेता परत जावं लागलंय. परंतु, तृप्ती देसाईंच्या डोक्याला मार लागलाय. कपालेश्वर मंदिरातून बाहेर नेत असतांना पोलिसांच्यानिर्भया गाडीचा रॉड तृप्ती देसाईंच्या डोक्याला लागला. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

trupti434कपालेश्वर मंदिरातील गाभार्‍यात दर्शन घेण्यासाठी तृप्ती आज शहरात दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना भाविक जिथपर्यंत दर्शन घेतात तिथपर्यंतंच दर्शन घ्यावं अशी नोटीस बजावल्यानं आज काय होणार हा प्रश्न होता. तृप्ती देसाईंनी पोलिसांची नोटीस धुडकावून गाभार्‍यात दर्शन घेणारंच अशी भूमिका घेतल्यानं कपालेश्वर आवारात मोठा जमाव जमला आणि जोरदार घोषणा आणि धक्काबुक्की सुरू झाली. पण पोलिसांनीही त्यांना नोटिस बजावली होती. दरम्यान भाविकांनी केलेल्या कडव्या विरोधाचा सामना आज तृप्ती देसाईला करावा लागला. प्रचंड धक्काबुक्कीतून त्यांना पोलिसांनी बाहेर काढून पुण्याकडे रवाना केलं. दरम्यान आपल्याला दुखापत झाल्याचा आरोपही तृत्पी देसाई यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2016 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...