घाटकोपरमध्ये शिवसेनेची 'पोश्टर'बाजी; प्रकाश मेहतांना दाखवलं मांजर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 26, 2016 01:39 PM IST

घाटकोपरमध्ये शिवसेनेची 'पोश्टर'बाजी; प्रकाश मेहतांना दाखवलं मांजर

Prakash Mehta2131

26 मे  :  मुंबई महापालिका निवडणुक जवळ येऊ लागताच भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये 'पोस्टर वॉर' सुरू झाले आहे. 'मुंबईतील वाघ आता संपले, आता सिंहांचे राज्य सुरू झाले आहे', असं वक्तव्य करत शिवसेनेवर निशाणा साधणारे भाजपचे मंत्री प्रकाश मेहता यांना शिवसेनेने एका पोस्टरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रकाश मेहता यांचा मतदार संघ असलेल्या घाटकोपर पूर्व भागात शिवसेना नेत्यांकडून मेहतांविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली असून मेहता यांची तुलना माजलेल्या बोक्याशी करण्यात आली आहे. 'माजलेला हा बोका स्वत:ला सिंह समजतो काय? या नकली सिंहाचा बुरखा आता फाडावाच लागेल', असं या पोस्टरमध्ये छापण्यात आलं आहे.

पोस्टरमध्ये मेहता यांना बोक्याचे रुप दिले असून (शिवसेनेचा) वाघ त्यांच्यावर झडप मारताना दाखवण्यात आलाय. शिवसेनेने या पोस्टरच्या माध्यमातून प्रकाश मेहता यांना चांगलाच दणका दिला आहे. विशेष म्हणजे, केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन 2 वर्षे पूर्ण झाल्याच्याच दिवशी मित्रपक्ष शिवसेनेने ही पोस्टरबाजी करून भाजपवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2016 11:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...