डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 ठार, 94 जखमी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 26, 2016 03:32 PM IST

डोंबिवलीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 5 ठार, 94 जखमी

Dombivlu fure213

26 मे  :  डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत आज (गुरूवारी) भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आत्तापर्यंत पाच जण ठार तर 90 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये चा समावेश आहे. जखमींमध्ये कंपनीतील कर्मचार्‍यांसह जवळपासच्या परिसरातील नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये कंपनीची संपूर्ण कंपनी भस्मसात झाली आहे. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या शेजारच्या हर्बर्ट ब्राऊन (आचार्य) कंपनी आणि अश्विक फार्मा यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

231

सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या, 15 -20 ऍम्ब्युलन्स तसंच पोलीसही दाखल झाले असून युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. जखमींना शिवम, एम्स, आरआर, चैतन्य, आयकॉन, आदि रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर डोंबिवली पूर्व भागात सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. धुरामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसंच अनेक घरांच्या आणि दुकानांच्या काचा फुटल्या आहेत. कंपनीपासून जवळच असलेल्या गांधीनगर भागात अनेक फ्लॅट्स आणि दुकानांच्या काचाही फुटल्या आहेत.

Loading...

खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने 5 किलोमीटरपर्यंतचा परिसर रिकामा केला असून वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

दरम्यान या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून, बचावकार्य वेगात करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

 डोंबिवलीत स्फोट- जखमी आणि मृत्युमुखी

हॉस्पीटल          जखमी          गंभीर            मृत्यू

शिवम                   30                          7

एम्स                     28                                                        2

आयकॉन              13                                                        2

नेपच्यून                  8

शास्त्रीनगर           15                                                        1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2016 12:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...