S M L

मध्य रेल्वेवर दुहेरी संकट, वाहतूक खोळंबली

Sachin Salve | Updated On: May 25, 2016 10:14 PM IST

mumbai local beby मुंबई - 25 मे :रोज मरे त्याला कोण रडे अशीच अवस्था मध्य रेल्वेची झालीये. सायन आणि विक्रोळी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवर चारही मार्गावर वाहतूक खोळंबलीये. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

मध्य रेल्वे मार्गावर ऐन संध्याकाळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. सायन स्टेशनजवळ सायन स्टेशनजवळ पेंटोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे स्लो ट्रॅकवरची वाहतूक ठप्प झालीये. हे होत नाही तेच विक्रोळी स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटली. गेल्या तासाभरापासून वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. अनेक लोकल ट्रॅकवर जागीच थांबल्या होत्या. तांत्रिक बिघाडामुळे लोकलमधील फॅन बंद झाले त्यामुळे ऐन उकाड्यात प्रवाशी घामाने ओलचिंब झाले. या दुहेरी कोंडीमुळे कल्याणच्या दिशेकडे जाणार्‍या वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. सायनजवळ पेटोग्राफ दुरस्तीचे काम झाले अशी माहिती मिळतेय पण वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2016 10:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close