नागपूर सेंट्रल जेलमध्ये दहशतवादी हिमायत बेगचा राजेश दवारेवर हल्ला

नागपूर सेंट्रल जेलमध्ये दहशतवादी हिमायत बेगचा राजेश दवारेवर हल्ला

  • Share this:

ASAS

25 मे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दहशतवादी हिमायत बेगने युग चांडक हत्याकांडातील प्रमुख आरोपी राजेश दवारेला बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी नागपूर कारगृहात घडल्याने खळबळ उडाली असून, कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांमध्ये जेवण वाढण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी हिमायतने यावेळी रागाच्या भरात भाजी वाढण्याच्या पळीने राजेश दवारेच्या डोक्यात वार केला. या घटनेत राजेश डवारेच्या डोक्यावर गंभीर इजा झाली असून त्याला सेंट्रल जेलमधील डिस्पेसरीत उपचार करून दुसर्‍या बराकीत रवाना करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात हिमायत बेग आणि जितेंद्रसिंह तोमर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 25, 2016, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading