बारावीचा निकाल जाहीर, सर्वाधिक निकालाची कोकण विभागाची 'हॅट्‌ट्रिक'

बारावीचा निकाल जाहीर, सर्वाधिक निकालाची कोकण विभागाची 'हॅट्‌ट्रिक'

 • Share this:

12th result ou êËׯÖÖêt

25 मे :  राज्याच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवारी) जाहीर झाला आहे.

राज्याचा निकाल 86.60 टक्के लागला असून तो गेल्या वर्षीपेक्षा 4.66 टक्क्यांनी घसरला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 93.29 टक्के लागला असून सलग तिसर्‍यांदा त्यांनीच पुन्हा बाजी मारली आहे.

विभागीय निकाल

 • सरासरी : 86.60 टक्के
 • कोकण - 93.29 टक्के
 • मुंबई - 86.08 टक्के
 • पुणे - 87.26 टक्के
 • कोल्हापूर - 88.10 टक्के
 • औरंगाबाद 87.80 टक्के
 • नाशिक - 83.89 टक्के
 • नागपूर -86.35 टक्के
 • लातूर -86.28 टक्के
 • अमरावती - 85.81 टक्के

तर यंदाही मुलींनी मुलांना मागे टाकण्याचा सिलसिला कायम ठेवला असून मुलींचा एकूण निकाल 90.50 टक्के, तर मुलांचा निकाल 83.46 टक्के लागला आहे.

 • मुलांची टक्केवारी- 83.46 टक्के
 • मुलींची टक्केवारी – 90.50 टक्के

दरम्यान, विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. तर निकालाची मुळ प्रत येत्या 3 जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात वितरित केली जाईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे. तर उद्यापासूनच फेरतपासणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यावेळी फेरपरीक्षा 9 जुलैला होणार आहे.

इथे पाहाता येईल निकाल

 • www.mahresult.nic.in
 • www.result.mkcl.org
 • www.maharashtraeducation.com
 • http://maharashtra12.knowyourresult.com
 • www.rediff.com/exams
 • http://maharashtra12.jagranjosh.com

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 25, 2016, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading