भारत आणि इराणमध्ये चाबहार बंदराचा महत्त्वपूर्ण करार

भारत आणि इराणमध्ये चाबहार बंदराचा महत्त्वपूर्ण करार

  • Share this:

india iran23 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी इराण दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे अध्यक्ष हुसेन रुहानी आणि दोन्ही देशांची शिष्टमंडळांची बैठक पार पडली. मोदी आणि रुहानी यांच्यात द्वीपक्षीय चर्चा झाली, त्यात भारत आणि इराणदरम्यान 12 करार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे अध्यक्ष रूहानी यांनी यावर स्वाक्षर्‍या केल्या. त्यातला महत्त्वाचा करार म्हणजे चाबहार बंदराबाबतचा करार...भारत इराणमधलं चाबहार बंदर विकसित करण्यासाठी मदत करणार आहे.

रेल्वे, ऊर्जा, शिक्षण आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचे नवे पर्व यामुळे सुरू होणार आहे. भारत या बंदराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 20 कोटी डॉलर्स गुंतवणार आहे. व्यावसायिक दृष्टीनं तर आहेच, पण सामरिक दृष्टीनंही हे बंदर महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 23, 2016, 3:44 PM IST

ताज्या बातम्या