बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड

  • Share this:

22 may

22 मे :  बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 41 वर्षांचे भाजप खासदार अनुराग ठाकुर बीसीसीआयचे सर्वात तरुण अध्य़क्ष बनले आहेत.

ठाकूर यांनी बीसीसीआयच्या सचिवपदाचा राजीनामा देऊन अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष सौरव गांगुलीही तिथं हजर होते. ठाकूर यांनी बीसीसीआयच्या सचिवपदाचा राजीनामा देऊन अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार यंदा पूर्व विभागाकडे होता. म्हणजेच अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला पूर्व विभागातील किमान एका संघटनेकडून शिफारस गरजेची होती. पण पूर्व विभागातील बंगाल, ओरिसा, आसाम, झारखंड, त्रिपुरा आणि नॅशनल क्रिकेट क्लब या सहाही संघटनांनी ठाकूर यांनाच पाठिंबा दिला. त्यामुळे आज मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत अनुराग ठाकूर यांची अध्यक्षपी बिनविरोध निवड झाल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे

कोण आहे अनुराग ठाकूर?

- हिमाचल प्रदेशमधल्या हमीरपूरमधून भाजप खासदार

- 2008 साली पहिल्यांदा खासदार झाले

- हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाल यांचे चिरंजीव

- हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष

- 2001-02 साली हिमाचलसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले

- सध्या बीसीसीआयचे सरचिटणीस

- बीसीसीआयचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 22, 2016, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading