कोल्हापूर - 21 मे : पुरोगामी विचारांचा वारसा जपणार्या कोल्हापूर शहरात आजपासून मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालीय. कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालंय. पुढचे 2 दिवस आता करवीरवासियांना मुस्लीम बांधवांचं मराठी साहित्य अनुभवण्याची संधी मिळालीय.
2 दिवस हे संमेलन चालणार असून कथाकथन, कवितांचे वाचन, विविध विषयांवरचे परिसंवाद, छायाचित्रांचे प्रदर्शन या संमेलनाच्या निमित्तानं भरवण्यात आलंय. उद्घाटनावेळी एका स्मरणिकेचे प्रकाशही करण्यात आले. तसंच मुस्लीम बोडीर्ंगच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत आणि कुराण वाचन करुन उपस्थितांचे स्वागत केले. तसंच कोल्हापूरमधल्या मुस्लीम समाजातल्या लेखकांच्या पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
महापौर अश्वीनी रामाणे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह श्रीमंत शाहू महाराज आणि खासदार संजय काकडे यांच्या उपस्थितीत रोपट्याला पाणी घालून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या निमित्तानं भोसले नाट्यगृहामध्ये पुस्तकांचंही प्रदर्शन भरवण्यात आलं असून राज्यातल्या मुस्लीम मराठी साहित्यिकांसह परराज्यातलेही साहित्यिक या संमेलनामध्ये सहभागी झालेत. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी मुस्लीम साहित्य कसं महत्वाचं आहे आणि समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मुस्लीम साहित्यिकांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा