News18 Lokmat

पालघरमध्ये 27 कोटींचं ड्रग्ज जप्त

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 20, 2016 09:29 AM IST

Drugs nnपालघर - 20 मे : जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातून तब्बल साडे सातशे किलो ड्रग्ज पकडण्यात आलंय. पकडलेल्या ड्रग्जची किंमत 27 कोटी 50 लाख असल्याचं समजतंय. अहमदाबाद एटीएस आणि वाडा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय.

वाडा येथे गौरापुर गावात विवेकानंद उर्फ विवेक राजाराम कुबल याच्या फार्म हाऊस मधील बंगल्यात मेथँक्लोन (मॅन्ड्रेक्स) या नावाच्या अंमली पदार्थाचा साठा पालघरच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी पकडला आहे. या बंगल्यातून 550 किलो ग्राम मेथँक्लोन (मॅन्ड्रेक्स) सापडला आहे. याची बाजारात किंमत 27 कोटी 50 लाख एवढी आहे. याप्रकरणी बंगल्याचा मालक विवेकानंद उर्फ विवेक राजाराम कुबल तसंच आणखी एका इसमाला अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2016 09:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...