प्रेयसीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 18, 2016 09:37 AM IST

प्रेयसीच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

नाशिक -18 मे : एरव्ही पुरुषांच्या जाचाला वैतागून महिला आपला जीवन संपवत असल्याचं आपण बघितलंय, पण नाशकात एक महिलाच्या त्रासास कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विजय अहिरे असं या तरुणाचं नाव आहे.love_story4

पंचवटी परिसरात राहणारा 23 वर्षीय विजय अहिरे या तरुणाचे परिसरातच राहणार्‍या महिलेशी प्रेमसंबंध जुळून आले. जिथे प्रेम आलं तिथे भेटवस्तू ही आल्यातच..आणि विजयने ही आपल्या प्रेयसीला विविध भेटवस्तू देण्यास सुरुवात ही केली. सर्व प्रेम प्रकरण मुलीच्या आईलाही मान्य होतं. पण मुलीच्या आणि तिच्या आईच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. त्यांना वाटलं विजय हा खूप श्रीमंत आहे. हा चांगले पैसे देऊ शकतो आणि परिस्थितीचा बहाणा करत या मायलेकींनी विजयकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.

विजय समोर एक एक सत्य समोर येत गेलं तसातसा विजयच या मुलीला भेटणं ही कमी झालं. आणि जेव्हा विजयला समजलं की ही एक विधवा स्त्री आहे. आणि तेही आत्तापर्यंत हिचे 2 जणांशी लग्न झाले होते. त्यावरून विजय आणि या महिलांमध्ये वाद वाढतच गेले इतकेच नाही तर या महिलांनी विजयला मारहाण करत चोरी, बलात्कार सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देखील दिली.

आणि याच जाचाला कंटाळून विजयने विष प्राशन करत गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत चिट्ठी पोलिसांना मिळाली आहे त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा होऊ शकला.

या महिलांनी विजय सारख्या आणखी किती गंडा घातलाय याचा तपास पोलीस करत आहेत. पैश्यांसाठी आणि आपल्या चैनीसाठी या महिलांनी केलेल्या कृत्याची सर्वत्र निंदा होतेय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2016 09:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...