जाळ अन् धूर संगट, 'सैराट'ची 55 कोटींची झिंगाट कमाई!

जाळ अन् धूर संगट, 'सैराट'ची 55 कोटींची झिंगाट कमाई!

  • Share this:

sairat record brk

15 मे :  नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ने बॉक्स ऑफिसवरचे मराठी चित्रपटांसाठीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत 'सैराट' या चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवण्याचा मान पटकावला आहे. 15 दिवसांत तब्बल 55 कोटींची कमाई करत 50 कोटींच्यावर कमाई करण्याचा पहिला मान 'सैराट'ला मिळाल आहे. आर्ची आणि परशाची ही लव्हस्टोरी अजूनही राज्यभरातील थेटर्समधून हाऊसफुल्ल गर्दी खेचते आहे. 'सैराट'ची जादू अजूनही कायम असून प्रेक्षक 3-3 वेळा सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहातायंत.

आजवर एकाही मराठी सिनेमाला 50 कोटींपर्यंत मजल मारता आली नव्हती. यापूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' चित्रपटाने तीन आठवडय़ांत 40 कोटींची कमाई केली होती. 'सैराट'ने कमीतकमी दिवसांत हा आकडा पार करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून आपले नाव कोरलं आहे. यापूर्वी 'नटसम्राट'ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर 9 दिवसात नानाचा 'नटसम्राट' 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या 10 दिवसांतच पार करून नवा विक्रम केला आहे.

सैराट सिनेमानं सर्व रेकॉर्ड मोडीत काढत थेट 55 कोटींची कमाई केली असून अजूनही त्यांची विक्रमी घौडदौड सुरुच आहे. 'सैराट'ने पहिल्या आठवड्यात 25.50 कोटींचा टप्पा पार केला होता. दुसर्‍या आठवड्यात 'सैराट'ची कमाई 26.50 कोटी इतकी झाली आहे. 'सैराट'ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 15, 2016, 1:43 PM IST

ताज्या बातम्या