News18 Lokmat

शशांक मनोहर आयसीसीच्या अध्यक्षपदी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 12, 2016 12:55 PM IST

शशांक मनोहर आयसीसीच्या अध्यक्षपदी

shashank_manohar12 मे : बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे शशांक मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आयसीसीचे नवे बॉस म्हणून शशांक मनोहर इनिंग खेळणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.आयसीसी अध्यक्षपदासाठी मनोहर यांनी बीसीसीआयंचं अध्यक्षपद सोडलं होतं. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आयसीसीचा अध्यक्ष दोन पदावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनोहर यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलं आणि आता मनोहर यांची आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2016 12:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...