विजय मल्ल्याला हद्दपार करून भारतात पाठवण्यास ब्रिटनचा नकार

विजय मल्ल्याला हद्दपार करून भारतात पाठवण्यास ब्रिटनचा नकार

  • Share this:

vijay mallaya412 मे : कर्जबुडवे उद्योजक विजय मल्ल्याला हद्दपार करून भारतात पाठवायला ब्रिटननं स्पष्ट नकार दिला आहे. पण मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्याच्या भारताच्या विनंतीवर आपण विचार करू शकतो, असे ब्रिटन सरकारने स्पष्ट केलं.

मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर प्रत्यार्पण प्रक्रियेची सुरुवात करण्यात येईल, असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितलं. मल्ल्यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यात यावे, अशी विनंती भारत सरकारने पंधरा दिवसांपूर्वी ब्रिटनला केली होती. मात्र ब्रिटनने भारताला काल उत्तर दिलं. मल्ल्याचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. तसंच त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीने वैध पासपोर्टच्या आधारावर ब्रिटनमध्ये प्रवेश केला असेल आणि नंतर त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असेल तरीदेखील त्या व्यक्तीला हद्दपार केले जाऊ शकत नाही, असे ब्रिटनने भारताला कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 12, 2016, 10:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading