News18 Lokmat

अखेर शशांक मनोहर यांचा राजीनामा, पवारांचं नाव चर्चेत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 10, 2016 05:15 PM IST

अखेर शशांक मनोहर यांचा राजीनामा, पवारांचं नाव चर्चेत

10 मे : बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अखेर आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी शशांक मनोहर यांनी राजीनामा दिला आहे. शशांक मनोहर यांच्यानंतर आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत आलंय.

शशांक मनोहर यांना आयसीसीची निवडणूक लढवायची आहे. मनोहर हे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन अशी दुहेरी भूमिका बजावत होते. आयसीसीच्या नव्या चेअरमनची निवड ही मेच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे. आणि आयसीसीच्या नव्या नियमांनुसार चेअरमन पदावरच्या व्यक्तीला राष्ट्रीय किंवा राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये दुसरं पद भूषवता येणार नाही. त्यामुळे आयसीसीच्या चेअरमनपदावर पुन्हा निवडून यायचं, तर शशांक मनोहर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट होतं. अखेरीस शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या पदाला तिलांजली दिलीये. बीसीसीआयच्या इतर पदाधिकार्‍यांना मनोहर यांनी पदावर रहावं असं वाटत होतं. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर मनोहर अध्यक्षपदी निवडून आले होते. आता मनोहर यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजय शिर्के यांचं नाव आघाडीवर आहे. शरद पवारांनी याआधीही बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2016 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...