मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही झाला सैराटमय, शेवट पाहून झाला नि:शब्द

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही झाला सैराटमय, शेवट पाहून झाला नि:शब्द

  • Share this:

Amir khan on Sairat

09 मे : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणार्‍या 'सैराट'ने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानलाही येड लावलं आहे. सैराट चित्रपट पाहून बॉलिवूडचा परफेक्शनिस्टही निःशब्द झाला आहे. आमिरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या 'सैराट' भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

नुकताच सैराट पाहिला. माझं हृदय हेलावून गेलं आहे. चित्रपटाच्या शेवटाच्या धक्क्यातून अजून सावरतोय, असं आमिर खानने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय दिग्दर्शक नागराज मंजुळेसह संपूर्ण स्टारकास्टचे आमीरने तोंडभरून कौतुक केले आहे. आमिरने सैराटबाबतीत एकूण तीन ट्विट्स केले. त्यातील दुसर्‍या ट्विटमध्ये आमीरने दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरु, अभिनेता आकाश ठोसर यांच्यासह सहाय्यक भूमिकेत असलेल्या तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख यांचेही यांचं अभिनंदन केलं आहे.  विशेष म्हणजे अद्यापही सैराट न पाहिलेल्या प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचं आवाहन ट्वीटमध्ये आमिरने केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 10, 2016, 9:17 AM IST

ताज्या बातम्या