03 मे : चित्रपट रसिकांना भूरळ घालणार्या आणि अवघ्या चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिलेल्या 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज (मंगळवार) दिल्लीत वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखजीर्ंनी विजेत्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव केला. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनीही नाव कोरलं आहे. 'सैराट' या सिनेमातील भूमिकेसाठी विशेष दखल घ्यायला लावणार्या अभिनेत्री रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच पार्श्वगायक महेश काळे यांनाही कट्यार काळजात घुसली या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.
अभिनेत्री कंगना राणावतला 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर यंदाच्या वर्षी अभिनेते अमिताभ बच्चन 'पीकू' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे मानकरी ठरले आहेत. 'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी संजय लीला भन्साळी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत. तर सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार बाहुबली सिनेमाला मिळाला आहे. याशिवाय तलवार सिनेमासाठी विशाल भरद्वाज यांना सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर दम लगाके हैश्यामध्यल्या गाण्यासाठी मोनाली ठाकूरला सर्वोत्कृष्ट गायिकेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार सोहळ्यादरम्यान महेश काळे यांनी 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमातील एका गाण्यानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.
63 वं राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- रिंगण
सर्वोत्कृष्ट गायक - महेश काळे - कट्यार काळजात घुसली
सर्वोत्कृष्ट लघुपट - औषध- अमोल देशमुख
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक लघुपट-(पायवाट) मिथुनचंद्र चौधरी
विशेष उल्लेखनीय पुरस्कार - रिंकू राजगुरु - सैराट
सर्वोत्कृष्ट पदार्पण लघुपट - दारवठा- निशांत रॉय बोंबार्डे
सर्वोत्कृष्ट सिनेमा - बाहुबली
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिताभ बच्चन (पिकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भंसाळी
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- दम लगा के हैशा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, परिक्षक पसंती - कल्की कोचलीन
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक - रेमो डिसुझा
सर्वोत्कृष्ट गीतकार - वरूण ग्रोव्हर - ये मोह मोह के धागे
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा - बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - बाहुबली
सर्वोत्कृष्ट रूपांतरीत पटकथा - विशाल भारद्वाज (तलवार)
सर्वोत्कृष्ट गायिका - मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण - नीरज घेयवान (मसान)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा