News18 Lokmat

आज राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण, महेश काळे आणि 'आर्ची'चा होणार गौरव

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 3, 2016 11:39 AM IST

आज राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण, महेश काळे आणि 'आर्ची'चा होणार गौरव

03 मे : 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज संध्याकाळी पार्श्वगायक महेश काळे, आर्ची अर्थात रिंकू राजगुरु यांच्यासह अन्य मराठी-हिंदी कलाकारांचा गौरव होणार आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीत वादळ आणणार्‍या 'बाहुबली'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत यांचा सन्मान होईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांना गौरवण्यात येणार आहे. 'सैराट'मधील भूमिकेमुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरु, कट्यार चित्रपटातील गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घालणारे पार्श्वगायक महेश काळे यांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.

63 वं राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- रिंगण

सर्वोत्कृष्ट गायक - महेश काळे - कट्यार काळजात घुसली

Loading...

सर्वोत्कृष्ट लघुपट - औषध- अमर देशमुख

सर्वोत्कृष्ट शैक्षणिक लघुपट-(पायवाट) मिथुनचंद्र चौधरी

विशेष उल्लेखनीय पुरस्कार - रिंकू राजगुरु - सैराट

सर्वोत्कृष्ट पदार्पण लघुपट - दारवठा- निशांत रॉय बोंबार्डे

सर्वोत्कृष्ट सिनेमा - बाहुबली

सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिताभ बच्चन (पिकू)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भंसाळी

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- दम लगा के हैशा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, परिक्षक पसंती - कल्की कोचलीन

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक - रेमो डिसुझा

सर्वोत्कृष्ट गीतकार - वरूण ग्रोव्हर - ये मोह मोह के धागे

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा - बजरंगी भाईजान

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - बाहुबली

सर्वोत्कृष्ट रूपांतरीत पटकथा - विशाल भारद्वाज (तलवार)

सर्वोत्कृष्ट गायिका - मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण - नीरज घेयवान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2016 11:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...