बॉक्स ऑफीसवर ‘सैराट’ सुस्साट; 3 दिवसात 12.10 कोटींची कमाई

बॉक्स ऑफीसवर ‘सैराट’ सुस्साट; 3 दिवसात 12.10 कोटींची कमाई

  • Share this:

sairat

मुंबई – 02 मे :  संपूर्ण महाराष्ट्राला 'यडं लावणार्‍या' सैराट या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अगदी धुमाकूळ घातला आहे. सैराटने अवघ्या 3 दिवसांत 12.10 कोटींची कमाई केली आहे.प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहता हा चित्रपट कमाईच्या बाबतीत 'नटसम्राट'ला मागे टाकण्याची शक्यता आहे.

याचवर्षी रिलीज झालेल्या 'नटसम्राट'ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर चौथ्या आठवड्यात हा आकडा 40 कोटींच्या घरात गेला होता.

'सैराट'ने पहिल्याच दिवशी 3.55 कोटी आणि दुसर्‍या दिवशी 3.80 कोटींची कमाई केली. त्यामुळे नटसम्राटला मागे टाकत, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.

अजय-अतुलचं संगीत, थिरकायला लावणारी गाणी, नागराज मंजुळेचे दिग्दर्शन, रिंकू-परश्या जोडीची कमाल केमिस्ट्री या सिनेमाची सगळेच आतूरतेनं वाट बघत होते. त्याचा परिणाम म्हणून पहिल्या दिवसापासूनच थिएटरवर 'हाउसफुल्ल'चा बोर्ड झळकतोय. 'सैराट' एकूण किती कमाई करतो, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ही घोडदौड अशीच सुरू राहणार असंच दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 2, 2016, 4:41 PM IST

ताज्या बातम्या