मंदिरात प्रवेशासाठी हट्ट धरणारे हिंदू नाहीच - प्रविण तोगडिया

मंदिरात प्रवेशासाठी हट्ट धरणारे हिंदू नाहीच - प्रविण तोगडिया

  • Share this:

praveen_togadiyaनाशिक - 01 मे : विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया अनेक जावईशोध लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. असाच एक शोध त्यांनी नाशिकमध्ये लावला. मंदिरात प्रवेशासाठी हट्ट धरणारे हिंदू नाहीतच, असं तोगडिया म्हणाले. अर्थातच त्यांचा रोख महिलांकडे होता. पण, मग हिंदू नसतील तर मग ते कोणत्या धर्माचे आहेत, हे मात्र तोगडियांनी सांगितलं नाही.

तसंच विरोध करणार्‍याच्या छातीवर पाय देवून राम मंदिर बांधणार असं वक्तव्यही प्रविण तोगडीया यांनी केलं.त्याचबरोबर मालेगाव स्फोटात हिंदू आरोपींना देखिल सोडा असं ही ते म्हणाले. नाशिक आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात आले असता ते पत्रकांराशी बोलत होते. विशेष म्हणजे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शनी शिंगणापूर, कोल्हापूरची अंबाबाई आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी लढा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: May 1, 2016, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading