उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोरेगाव उड्डाणपुलाचं लोकार्पण

उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोरेगाव उड्डाणपुलाचं लोकार्पण

  • Share this:

gorengaon_birdgमुंबई - 30 एप्रिल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (शनिवारी) गोरेगाव उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं. या पुलाला मृणालताई गोरे यांचं नाव देण्यात आलंय.

यावेळी बोलतांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुलाला मृणालताईंचं नाव दिल्याबद्दल पालिकेचंअभिनंदन केलं. लोकप्रतिनिधीनं आपल्या जीवनात कसं कार्य केलं पाहिजे. समाजाच्या वंचितांसाठी कसं काम केलं पाहिजे. हे मृणालताईंकडून आम्ही शिकलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. एका वर्षात केंद्र आणि राज्य सरकारनं कोस्टल रोडच्या सगळ्या परवानग्या मिळवल्या आहेत.त्यामुळे लवकरच टेंडर काढू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तर, वर्ष कोणताही असो, मृणालताई तिथे जायच्या विषयाची माहिती घ्यायच्या आणि मग गोष्टी मांडायच्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते खासदार गजानन किर्तीकर , उद्योग मंत्री सुभाष देसाई ,राज्यमंत्री रवींद्र वायकर , महापौर स्नेहल आंबेरकर, आमदार सुनील प्रभू उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 30, 2016, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading