आदर्श सोसायटी पाडा, हायकोर्टाचे आदेश

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2016 04:52 PM IST

आदर्श सोसायटी पाडा, हायकोर्टाचे आदेश

aadarsh_29 एप्रिल : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणार्‍या आणि एका मुख्यमंत्र्यांना पदावरून पायउतार होण्यास भाग पाडणार्‍या वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचे आदेश हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले आहे. तसंच या प्रकरणातील आरोपींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नींसाठी आदर्श सोसायटी नेते आणि अधिकार्‍यांच्या संगमताने उभी राहिली. पण, या इमारतीत वीरपत्नींच्या नावे फ्लॅट लाटल्याचा आदर्श घोटाळा समोर आल्यामुळे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. या प्रकरणी प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर सुनावणीदरम्यान

मुंबई हायकोर्टाने आदर्श सोसायटीला जोरदार दणका दिलाय. आदर्श सोसायटीची 31 मजली इमारत पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. आदर्श सोसायटीकडे सीआर झेड परवानगी नव्हती त्यामुळे हायकोर्टाने हे आदेश दिले आहे. तसंच हे आदेश देत 12 आठवड्यांची स्थगिती दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2016 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...