सुप्रीम कोर्टानेही टोलावला 'आयपीएल'चा चेंडू राज्याबाहेरच !

सुप्रीम कोर्टानेही टोलावला 'आयपीएल'चा चेंडू राज्याबाहेरच !

  • Share this:

दिल्ली - 27 एप्रिल : महाराष्ट्रात दुष्काळाचा पार्श्वभूमीवर हायकोर्टापाठोपाठ सुप्रीम कोर्टानेही 'आयपीएल'चा चेंडू महाराष्ट्राबाहेर टोलावलाय. सुप्रीम कोर्टानेही दुष्काळाच्या परिस्थिती राज्यात आयपीएलचे सामने खेळवू नये असा आदेश दिलाय. त्यामुळे आता आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवले जाणार हे आता स्पष्ट झालंय.

supreme_court33महाराष्ट्र दुष्काळाला सामोरं जातोय. अशा परिस्थिती आयपीएलच्या नवव्या सिझनला सुरूवात झाली. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आयपीएलचे सामने आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे सामन्यांसाठी स्टेडियमवर लाखो लिटर पाण्याची नासाडी केली जात होती. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात दोन याचिका दाखल झाल्या होत्या. हायकोर्टाने 30 एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर खेळवावे असं आदेश दिले आहे.

हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देत बीसीसीआय आणि एमसीएने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळू द्यावे अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. पण, दुष्काळाची परिस्थिती पाहता सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय आणि एमसीएला दिलासा दिला नाही.

राज्यात भीषण पाणीटंचाई असून अशा परिस्थिती पाण्याची नासाडी करणे योग्य नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेरच खेळवावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे आता बीसीसीआय आणि एमसीएपुढील सर्व दरवाजे बंद झाले आहे. आता आयपीएलचे सामने राज्याबाहेरच होणार यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2016 02:09 PM IST

ताज्या बातम्या