26 एप्रिल : ठाण्यातल्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात काल (सोमवारी) एक मोठा अनर्थ टळला. प्रयोग संपल्यावर रात्री साडे अकरा वाजता पीओपीचा स्लॅब कोसळला आणि तब्बल 250 खुर्च्यांवर पडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अवघ्या 4 वर्षांपूर्वीच या नाट्गृहाचं बांधकाम ठाणे महापालिकेनं केलं असताना हा प्रकार घडला आहे. जर प्रेक्षक आत असताना स्लॅब पडला असता तर काय अनर्थ झाला असता.
दरम्यान, पाण्याच्या गळतीमुळे हा प्रकार घडल्याचं आता समोर आलं असून सध्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. पण प्रेक्षकांमध्ये लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने नागरीकांनी जीव मुठीत घेऊन नाटकाचे प्रयोग पाहायचे का? असा संतप्त सवाल आता ठाणेकर विचारत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv