S M L

सलमानऐवजी एखाद्या खेळाडूची निवड करायला हवी होती -मिल्खा सिंग

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2016 12:50 PM IST

सलमानऐवजी एखाद्या खेळाडूची निवड करायला हवी होती -मिल्खा सिंग

25 एप्रिल : रिओ ऑलिम्पिकच्या गुडविल ऍम्बेसेडरपदी सलमान खानपेक्षा इतर यशस्वी खेळाडूची निवड करायला हवी होती अशी खंत ज्येष्ठ ऑलम्पिक धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केलीये. याआधीही कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही सलमानच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

milkha_singh_salmanअभिनेता सलमान खान यावर्षी होणार्‍या रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय चमूचा 'गुडविल ऍम्बेसेडर' असणार आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने या संदर्भात घोषणा केली. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एखाद्या बॉलिवूड स्टारला ऑलिम्पिक चमूचा ऍम्बेसेडर नेमण्याची ही पहिलीच वेळ आहे. सलमानने हा सन्मान मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतात सर्व प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पण, यावरून आता एक नवा वाद निर्माण झालाय. गुडविल ऍम्बेसेडर म्हणून एखाद्या प्रसिद्ध खेळाडूची निवड करायला हवी होती, असं मत अनेक दिग्गजांनी बोलून दाखवलंय. योगेश्वर दत्त यांच्यापाठोपाठ आता मिल्खा सिंग यांनी या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, सलमानमुळे ऑलिम्पिक टीव्हीवर बघणार्‍या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होईल, असं काही जणांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2016 12:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close