जगभरात फिरणारे मोदी मराठवाड्यात का गेले नाही ?-कन्हैया कुमार

जगभरात फिरणारे मोदी मराठवाड्यात का गेले नाही ?-कन्हैया कुमार

  • Share this:

मुंबई - 23 एप्रिल : मराठवाड्यात दुष्काळाने होरपळतोय. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची ही वेळ आहे. पण, जगभरात फिरणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून मराठवाड्यात का पोहोचले नाही असा थेट सवाल जेएनयू संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने विचारलाय. तसंच आपण लोकशाही मानता तर मग प्रत्येकाला भारतमाता की जय बोलण्यासाठी दबाव का आणता ? असा सवालही संघ आणि भाजपला कन्हैया कुमारने विचारला.

kanhaiya_kumar_vs_modiजेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार यांची चेंबूरमधील टिळकनगरमध्ये एका बंद सभागृहात सभा पार पडली. यावेळी कन्हैयाकुमारने भाजप आणि संघावर सडकून टीका केली. आपण जिथे जातो तिथे आपल्यावर बूटफेक होते यावर मिश्किल भाष्य करत, बूट फेकणारे नेहमी डाव्या पायातला बूट फेकता. आणि ते अगदी बरोबर करता कारण आम्ही डावेच आहोत. आतापर्यंत इतके डावे बूटं फेकली गेली की यापुढे उजव्या पायातलाही बूट फेका म्हणजे एक जोडा पूर्ण होईल असा टोला कन्हैया कुमारने हल्लेखोरांना लगावला.

तसंच आम्ही बोलत राहणार, आमच्या काय ती कारवाई करायची आहे ती बिनधास्त करा. जरी आम्ही याची तक्रार करायची ठरवली तर पुतळेवाले आणि सुटवाले पीएम आपण आहात. ही सगळी तुमचीच माणसं आहे. त्यामुळे तक्रार तरी कुणाकडे करायची ?, लोकशाहीसोबत असलेल्यांनी आमच्यासोबत यावं आणि जे नाही त्यांनी बूट फेकणार्‍यांसोबत जावं. मी,फक्त मोदी आणि संघावर टीका करत नाही. तर उद्या वेळ पडल्यास काँग्रेसवरही टीका करेल, पण सध्या संघाची वेळ आहे. एक लक्षात ठेवा मी, जिंतनराम माझी यांचा गावाच आहे. त्यामुळे 'जब तक तोडेंगे नही तब तक छोडेंगे नही' अशा शब्दात कन्हैया कुमारने भाजप सरकारला सुनावले.

तुमच्याकडे पर्याय नसेल तर आम्ही पर्याय देतो. रोहित ऍक्ट लागू करा,जाती व्यवस्था बंद करा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवा, जेव्हा हे होईल आम्ही विरोध करणं बंद करू असा घणाघात कन्हैय्या कुमाराने भाजप सरकारवर केला. तसंच आमच्या सभांना कोण फंड देतं असा सवाल तुम्ही करताय. तर मग हे सांगा, पंतप्रधानांनी लाखोंचा सूट घातला होता त्याचा नंतर लिलाव केला. पण तो सूट बनवण्यासाठी कुणी फंड दिला हे आधी जाहीर करा असा प्रतिसवालही कन्हैया कुमारने उपस्थित केला.

संघाची कथनी आणि करनी वेगवेगळी आहे अशी टीका करत कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. मोदींनी जुमलेबाजी बंद करावी. आम्हाला घोषणाबाजी नकोय. ठोस कार्य हवं आहे. मोदींनी मोठा गाजावाजा करून मेक इन इंडियाचा नारा दिला पण हे फेक इन इंडिया आहे. देशात कुठेही काही घडलं तर मोदी वेळेवर पोहोचता. मराठवाड्यात एवढा दुष्काळ पडलाय. लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. अशा वेळी जगभरात फिरणारे पंतप्रधान मोदी मराठवाड्यात का आले नाही ? असा थेट सवाल कन्हैया कुमार पंतप्रधान मोदींना विचारलाय. तुम्ही जेवढे रोहित वेमुला मारणार तेवढे रोहित उभे राहतील असंही कन्हैयाकुमारने ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2016 08:27 PM IST

ताज्या बातम्या