नागपूरमध्ये बेघरांना 4 लाखांत घर देणार, गडकरींची घोषणा

नागपूरमध्ये बेघरांना 4 लाखांत घर देणार, गडकरींची घोषणा

  • Share this:

gadkari-l1नागपूर - 23 एप्रिल : नागपूरमध्ये बेघरांना चार लाखांमध्ये घर उपलब्ध करून देण्यासाठी घरकुल योजना आणणार असल्याची घोषणी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. जवळपास 50 हजार लोकांना स्वस्त घरं उपलब्ध करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलंय. 1000 रुपये स्क्वेअर फूट किंमतीत घर देण्याचा हा प्रस्ताव असून अशी योजना तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांना दिल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं.

बेघरांना घरं देण्यासाठी केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरींनी पुढाकार घेतलाय. 1000 रुपये स्क्वेअर फूट किंमतीत घर देण्याचा प्रस्ताव असून अशी योजना तयार कऱण्याचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहे. यासाठी एनआयटीचंही सहकार्य घेण्यात येईल अशी माहिती गडकरींनी दिली.

बेघर, भाजीवाले अगदी भिकारीही घेऊ शकतील असं घर बांधण्याचा प्रस्ताव पन्नास हजार लोकांसाठी स्वस्त घरांची नवी योजना आखण्यात येणार आहे.

तसंच नागपूर शहरासाठी गेल्या दोन वर्षांत 18000 कोटींचे प्रकल्प सुरू केले. चार महिन्यात नागपुरात 100 इथोनॉल आणि 50 बायोसीएनजीवर सुरू करणार आहे असंही गडकरींनी सांगितलं. तसंच राज्यात मुंबई, पुणे आणि ठाणे वगळता राज्यात सर्वत्र ई रिक्षाला परवानगी देण्यात येणार यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिलीये. तसंच यापुढे वीजेसाठी सांडपाणीच वापरणार असंही गडकरींनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 23, 2016, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading