चोरीचा माल 'ओएलक्स पे बेच दे', स्कॉलर दरोडेखोर गजाआड

चोरीचा माल 'ओएलक्स पे बेच दे', स्कॉलर दरोडेखोर गजाआड

  • Share this:

कोल्हापूर - 22 एप्रिल : इयत्ता दहावीमध्ये तब्बल 94.60 टक्के गुण मिळवलेला एक अत्यंत हुशार मुलगा चोरीच्या आरोपाखाली गजाआड झालाय. कोल्हापुरातला अवधूत पाटील हा 19 वर्षांचा मुलानं तब्बल 10 घरफोड्या केल्याचं आणि दोन मोटारसायकली चोरल्याचं उघड झालंय. केवळ चैनीसाठी त्यानं या घरफोड्या केल्यात. विशेष म्हणजे, ओएलएक्स पे बेच दे...या टॅग लाईनचा अवधूतने चोरीचा माल खपविण्यासाठी मोठ्या खूबीनं वापर केल्याचही पुढं आलंय.

kolhapur_$34भूदरगड तालुक्यातील देऊळवाडी इथला हा आहे 19 वर्षी अवधूत इश्वरा पाटील. अवधूत हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हूषार मुलगा आहे. त्याची आई अंगणवाडी शिक्षिका, तर मोठा भाऊ सत्यवंत हा पुण्यातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तसंच त्याची बहीणही बीएससी झाली आहे. कौटुंबिक पार्श्वभुमी शैक्षणिक असल्याने अवधूतलाही लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी लागली होती. त्यामुळे गावातील प्राथमिक महाविद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिकत असताना शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये 300 पैकी 298 गुण मिळवून अवधूतने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता.

तर इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत 300 पैकी 246 गुण मिळवून राज्यात बारावा क्रमांक मिळवून तो गुणवत्ता यादीत झळकला होता. इतकंच काय तर इयत्ता दहावीमध्ये अवधूतने 94. 60 टक्के गुण मिळवून आपली बौद्धिक चमक दाखवून दिली होती. त्यामुळे त्याची गावातही प्रचंड वाहवाही झाली.

त्यानंतर इयत्ता 11 वी साठी अवधूत एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून कोल्हापुरातल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात दाखल झाला. आणि शहरात तो भाड्याच्या खोलीत राहू लागला. दरम्यानं त्याला त्याच्या आई वडिलांनी खर्चासाठी दिलेले 1000 रुपये आणि त्याच्याकडे असणारा त्याच्या भावाचा मोबाईल कोणीतरी चोरुन नेला. याचा अवधूतला फार राग आला आणि त्याने रागापोटी चोर्‍या करण्यास सुरुवात केली. आणि इथूनच त्याच्या गुन्हेगारी दुनियेची सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2016 07:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading