शारिरिक संबंधांसाठी नकार देणार्‍या 250 तरुणींची आयसिसने केली हत्या

शारिरिक संबंधांसाठी नकार देणार्‍या 250 तरुणींची आयसिसने केली हत्या

  • Share this:

22 एप्रिल : आयसिस या दहशतवादी संघटनेनं क्रूरतेचा कळस गाठलाय. परपुरुषांशी शारिरिक संबंध ठेवायला नकार दिला म्हणून आयसिसनं तब्बल 250 मुलींना ठार मारलंय. उत्तर इराकमधल्या मोसूलमधली ही घटना आहे. या मुलींवर आयसिसच्या दहशतवाद्यांशी तात्पुरत्या विवाहबंधनात अडकण्याची जबरदस्ती केली जात होती. अर्थातच, मुलींनी नकार दिला. याचा राग म्हणून आयसिसनं या सर्व 250 मुलींना संपवलं. इराकमधल्या कुर्दीश लोकशाही पक्षानं या घटनेची माहिती दिली.isis452

आयसिसने या मुलींना अतिरेक्यांबरोबर तात्पुरत्या विवाहबंधनामध्ये राहण्याचा आदेश दिला होता. पण ज्या मुलींनी नकार दिला त्यांची अत्यंत निर्दयतेने आयसिसने हत्या केली. मोसूलचा ताबा घेतल्यानंतर आयसिसने मुलींना निवडून त्यांच्यावर अतिरेक्यांबरोबर विवाह करण्यासाठी जबरदस्ती सुरू केली. हा तात्पुरता विवाह असल्याचं त्यांना सांगण्यात येत होतं.

पण ज्या मुलींनी नकार दिला त्यांची हत्या केली असे कुर्दीश लोकशाही पक्षाचे प्रवक्ते सैद मामुझिनी यांनी सांगितलं. सेक्शुअल जिहाद नाकारणार्‍या आतापर्यंत 250 मुलींची आयसिसने हत्या केली असून, काहीवेळा त्या मुलींच्या कुटुंबालाही संपवलं असं मामुझिनी यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 22, 2016, 6:40 PM IST

ताज्या बातम्या