त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात साडी नेसून घेतलं दर्शन

त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात साडी नेसून घेतलं दर्शन

  • Share this:

tripti desai nashiokl

नाशिक - 21 एप्रिल : स्वराज्य संघटनेच्या महिलांच्या पाठोपाठ आज (शुक्रवारी) भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनीही त्र्यंबकेश्वराच्या गाभार्‍यात प्रवेश केला. अनेक दिवसांपासून त्र्यंबकमध्ये महिलांना गाभारा प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र त्याला मंदिर विश्वस्त आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.

अखेर मंदिराच्या नियमानुसार तृप्ती देसाईंनी साडी नेसून गर्भगृहात प्रवेश करून त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी, दर्शनानंतर तृप्ती देसाईंनी आनंद व्यक्त केला. तसंच सर्व मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

तर दुसरीकडे तृप्ती देसाईंना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल स्थानिक तरुणीने संताप व्यक्त केला. हा देसाईंचा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप करत गोंधळ घातला. पोलिसांनी संबंधित तरुणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तृप्ती देसाईंना तिथून तात्काळ रवाना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 22, 2016, 8:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading