चांगलं काम केलं म्हणूनच काढला सेल्फी, थोरातांकडून पंकजा मुंडेंची पाठराखण

चांगलं काम केलं म्हणूनच काढला सेल्फी, थोरातांकडून पंकजा मुंडेंची पाठराखण

  • Share this:

अहमदनगर - 19 एप्रिल : पंकजा मुंडे या उत्साही मंत्री आहेत. त्यांनी चांगलं काम केलं म्हणून सेल्फी काढला अशी पाठराखणच विरोधी पक्षातील काँग्रेसचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलीये. तसंच राज्यात दुष्काळ पडला म्हणून टीका करणार्‍यांनी घरी एसी बंद केले का असा सवालही थोरात यांनी विचारलाय.

thorat34232महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सेल्फी वादाबाबत अनपेक्षित पाठिंबा मिळालाय. चक्क विरोधी पक्षाच्या एका नेत्यानंच पंकजांची पाठराखण केली आहे. नगरचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंकजांना पाठिंबा दिलाय. पंकजा या उत्साही मंत्री आहेत, त्या उन्हातान्हात फिरतायेत आणि चांगलं काम केलं म्हणून सेल्फी काढला, असं थोरात म्हणाले. काँग्रेसचेच नेते पण थोरातांचे विरोधक मानले जाणारे विखे पाटलांवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. जे लोक पंकजांवर टीका करतायेत त्यांनी काय काम केलं, आणि दुष्काळ पडल्यावर त्यांनी आपले एसी बंद केलेत का, असा सवालही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 19, 2016, 10:44 PM IST

ताज्या बातम्या