'अतुल्य भारत'मधून बिग बींना डच्चू?

  • Share this:

amitabh_bachchan_2013_images

18 एप्रिल  : जगभरात खळबळ उडवणार्‍या पनामा पेपर्स लिक प्रकरणाचा पहिला झटका भारतात बिग बींना बसण्याची शक्यता आहे.  बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’ अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर करण्याला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या माहितीवरून याबाबत ट्विट केलं आहे.

पनामा पेपर्स प्रकरणात बिग बी यांचं नाव आल्यामुळे या निर्णय टाळण्यात आला आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारने कडक धोरण अवलंबलं आहे. त्यामुळेच पनामा पेपर्समध्ये अमिताभ बच्चनचं नाव येताच सरकारने सावध भूमिका घेतली आहे. यामुळे आता फक्त अभिनेत्री प्रियंका चोपडाच 'अतुल्य भारत'ची एकमेव ब्रँड ऍम्बेसिडर असेल.

पनामा पेपर्स लिक प्रकरणात अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह सहा जणांची नावं समोर आली आहेत. या प्रकरणात एकूण 500 भारतीयांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त केली आहे.  मात्र, याप्रकरणी त्यांना क्‍लीन चिट मिळेपर्यंत हा निर्णय लांबणीवर टाकल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2016 10:37 PM IST

ताज्या बातम्या