S M L

तीन महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी घटवलं 18 किलो वजन!

Samruddha Bhambure | Updated On: Apr 18, 2016 04:27 PM IST

 तीन महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी घटवलं 18 किलो वजन!

मुंबई - 18 एप्रिल :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून राजकीय 'वजन' सातत्यानं वाढत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं शारिरीक वजन मात्र कमी झालं आहे. फडणवीस यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून गेल्या तीन महिन्यात 18 किलोने वजन घटवलं आहे.

फडणवीस यांचं वजन तब्बल 122 किलो होतं. त्यानंतर फडणवीसांनी संतुलित आहार, पथ्य, नियमित व्यायाम आणि आवश्यक औषधांच्या जोरावर स्वत:च वजन 104 किलोपर्यंत कमी केलं. आगामी काळात 88 ते 90 किलोपर्यंत वजन कमी करण्याचे लक्ष्य फडणवीसांनी ठेवलं आहे.

डॉ. जयश्री तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वजन कमी केलं आहे. तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांची नियमित आरोग्य तपासणी होत होती. डाएटबरोबरच त्यांना दिवसाला 10 हजार पावले चालण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांचा हा सल्ला तंतोतंत पाळला आता त्याचे परिणाम दिसत आहेत, असे तोडणकर यांनी सांगितलं.

याशिवाय, शारीरिक व्यायामासाठी त्यांनी मिकी मेहता यांचे मार्गदर्शन घेतलं होतं. मुख्यमंत्र्यांना जेमतेम चार ते पाच तासांची झोप मिळतं. श्वासोच्छवासाच्या व्यायामाने अपुर्‍या झोपेचा शीण भरून काढला जातो, असं मिकी मेहता यांनी सांगितलं. तसंच वर्षाअखेरीपर्यंत त्यांना फिट अॅण्ड फाईन बनविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही मेहता यांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2016 04:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close