अखेर शाहिदने दिली गोड बातमीची कबुली

अखेर शाहिदने दिली गोड बातमीची कबुली

  • Share this:

Shahid And Mire

17 एप्रिल :  बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या बातमीला अखेर दुजोरा दिला आहे. शाहिद कपूरने स्वत: आपली पत्नी मीरा गर्भवती असल्याचं सांगत चाहत्यांना गोड बातमी दिली.

सुरूवातीला मीडियाने शाहिदला तू भविष्यात वडिलपणाच्या अनुभवासाठी कितपत तयार आहेस, असा प्रश्न विचारला. त्यावर शाहिद म्हणाला की, तुम्ही असं आडून आडून प्रश्न काय विचारता?. यानंतर त्याला थेट प्रश्न विचारला असता त्याने होय मी बाप होणार आहे, अशी कबुली दिली.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात शाहिद आणि मीरा विवाहबंधनात अडकले होते. नुकत्याच झालेल्या 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये मीरा राजपूतने रॅम्पवॉक केलं. यावेळी मीराने मसाबा गुप्ताने डिझाईन केलेला अटायर परिधान केला होता. मसाबा हिने रॅम्पवरील मीराचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर शाहिद आणि मीराच्या घरी नवी पाहुणा येणार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत रंगली होती. अखेर शाहिदने या गोड बातमीवर शिक्कामोर्तब केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2016 01:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading