रोहित वेमुलाची आई आणि भावाचा बौद्ध धम्मात प्रवेश

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2016 09:53 PM IST

रोहित वेमुलाची आई आणि भावाचा बौद्ध धम्मात प्रवेश

14 एप्रिल :  हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आई आणि भावानी मुंबईत आज (गुरूवारी) बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत दादर इथल्या आंबेडकर भवनात धम्म दीक्षा सोहळ्यात त्यांनी दीक्षा घेतली.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न स्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 125 वी जयंती आहे. या घटनेचे औचित्य साधून रोहित वेमुलाची आई राधिका आणि भाऊ राजा यांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्मात प्रवेश केला.

रोहित वेमुला हा हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करणारा विद्यार्थी होता. 17 जानेवारी रोजी त्यानं प्रशासनाकडून झालेल्या अन्यायामुळे आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर देशातलं राजकीय आणि सामाजिक जीवन ढवळून निघालं होतं. त्यानंतर देशभरात दलित आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. याचे पडसाद जेएनयू, पुणे आणि मुंबई विद्यापीठामध्येही पडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2016 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close