Elec-widget

30 एप्रिलनंतर आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवा-कोर्ट

  • Share this:

mumbai_court_ipl13 एप्रिल : राज्यात भीषण दुष्काळ असतांना लाखो लिटर पाण्याची नासाडी करणार्‍या आयपीएलची कोर्टाच्या लढाईत 'विकेट' पडलीये. मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला दणका देत 30 एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश दिले आहे.

एकीकडे राज्यात दुष्काळामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. अशा परिस्थिती आयपीएलने सामन्यासाठी वानखेडे मैदानावर क्रिकेट पिच तयार करण्यासाठी 40 लाख लिटर पाण्याची नासाडी केल्याचं समोर आलं. या विरोधात दोन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान बीसीसीआय आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आयपीएलसाठी पिण्याचं पाणी देणार नाहीच अशी ठाम भूमिका राज्य सरकारने मांडली होती. तर बीसीसीआयने अखेरपर्यंत आयपीएलचे सामने राज्यात खेळवण्यासाठी प्रयत्न केले. अखेरीस बीसीसीआयला कोर्टाने चांगलाच दणका दिलाय.

30 एप्रिलनंतरचे आय पी एल सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याचे मुंबई हायकोर्टाचे बीसीसीआयला आदेश दिले आहे. दुष्काळग्रस्त लोकांच्या समस्या नजरेआड करू शकत नाही, असं हायकोर्टानं म्हटलंय.

आयपीएलचे सामन महाराष्ट्राबाहेर हलवण्यासाठी बीसीसीआयला 15 दिवसांचा वेळ देण्यात आलाय. पैसा आणि पाणी तसंच मनोरंजन आणि दैनंदिन आयुष्य यांच्यात फरक केला जावा असी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

आम्ही राज्यात 40 लाख लिटर पाणी दुष्काळग्रस्त भागाला पोहोचवू तसंच 5 कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ असा युक्तीवाद बीसीसीसीआयनं केला होता. पण, आता हायकोर्टाने सामनेच राज्याबाहेर हलवण्याचा आदेश दिलाय. 30 एप्रिलनंतर नागपूरमध्ये 3, पुण्यात 6 आणि मुंबईत 4 सामने खेळवण्यात येणार होते. ते आता राज्याबाहेर खेळवले जाणार आहे.

Loading...

हे होणार महाराष्ट्रबाहेर सामने

- 1 मे - रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे)

- 7 मे - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (नागपूर)

- 8 मे - मुंबई इंडीयन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई)

- 9 मे - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (नागपूर)

- 10 मे - रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि सनरायझर्स हैदराबाद (पुणे)

- 13 मे - मुंबई इंडियन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (मुंबई)

- 15 मे - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (मुंबई)

- 15 मे - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद (नागपूर)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2016 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...