S M L

दुष्काळाचं दुष्टचक्र, या गावात 2 वर्षांपासून एकही लग्न झालं नाही !

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2016 07:07 PM IST

दुष्काळाचं दुष्टचक्र, या गावात 2 वर्षांपासून एकही लग्न झालं नाही !

नांदेड - 12 एप्रिल : दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाडयात मोठया प्रमाणावर स्थलांतर होत आहे. याच कारणाने नांदेड जिल्ह्यात एका महिला सरपंचाला कामाच्या शोधात गाव सोडाव लागलं. तर दुष्काळामुळे या गावात गेल्या दोन वर्षात एकही लग्न झालेलं नाही.

नांदेडमधील मुखेड या दुष्काळग्रस्त तालुक्यातील हिरानगर तांडा इथल्या महिला सरपंच राजश्री राठोड यांनी कामाच्या शोधत मुंबई गाठली. माळरानावर वसलेल्या हिरानगर ताड्यांत सर्व शेतकरी अल्पभुधारक आहेत. सध्या गावाला पाण्याच कुठलाच स्त्रोत नाही. एका टँकरने दोन फेर्‍यांद्वारे सध्या गावाला पाणी पुरवठा केला जातो. गेल्या तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने शेती पिकत नाही. अकराशे लोकसंख्या असलेल्या हिरानगर तांडा येथून तब्बल तीनशे जण कामासाठी बाहेर गावी गेले आहेत. दुष्काळामुळे या गावातील असंख्य तरूणीचे लग्न जुळत नाही. गेल्या दोन वर्षांपासून या गावात ना सनई चौघडा वाजला, ना कोनाच्या दारात मंडप सजला. एकही शुभकार्य या गावात झालं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2016 07:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close