News18 Lokmat

देवनार डेपो हलवण्यात यावा, राहुल गांधींची मागणी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2016 01:57 PM IST

देवनार डेपो हलवण्यात यावा, राहुल गांधींची मागणी

मुंबई - 12 एप्रिल : देवनार डंम्पिंग ग्राऊंड आग प्रकरणात आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही उडी घेतलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान राबत आहे. पण, राबवणे आणि करुन दाखवणे यात फरक असतो असा टोला राहुल गांधींनी लगावला. तसंच देवनार डेपो हटवण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देवनार डंम्पिंग ग्राऊंडला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि शहर अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. खुद्द राहुल गांधी यांनी देवनारच्या डेपोवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

देवनार डेपोची परिस्थिती भीषण आहे. इथं लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झालंय. यात एकाचा मृत्यू झालाय. वारंवार आग लागत असतांना याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय पावलं उचलली याचा खुलासा करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान राबत आहे. पण, एखादं अभियान राबवणं आणि करून दाखवणं यात फरक असतो. इथली परिस्थिती पाहता स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं असं वाटत नाहीये अशी टीका राहुल गांधींनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2016 01:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...