कळव्यात पाणीटंचाईचा बळी, लोकलच्या धडकेनं मुलीचा मृत्यू

कळव्यात पाणीटंचाईचा बळी, लोकलच्या धडकेनं मुलीचा मृत्यू

  • Share this:

kalva4ठाणे - 12 एप्रिल : राज्यभरात पाण्याचं संकट असताना पाणी टंचाईमुळे मृत्यू झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यातल्या कळवा परिसरात एका 11 वर्षांच्या मुलीचा लोकलच्या धडकेनं मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडलीये.

पाणी टंचाईमुळे आता ठाण्यात एक 11 वर्षी चिमुरडीचा जीव गेलाय. ही धक्कादायक घटना ठाण्यातील कळवा भागातील भास्करनगर मध्ये घडलीये. या परिसारत मोठ्या प्रमाणत पाणीटंचाई आहे. या परिसरातील नागरिक यासाठी रेल्वेलाईन ओलांडून भास्करनगर मधून पाणी आणतात आणि त्यांचा हा रोजचा दिनक्रम आहे.

काल ही तसंच घडलं पाचवी इत्तेत शिकणारी 11 वर्षी गुलफिज्जा आपल्या घरातील लोकांसाठी पाणी आणण्यासाठी वाघोबा नगर मध्ये गेली व परत येताना रस्ता ओलांडताना तिला लोकलचा धक्का लागला यात तिचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेने सर्व कळवात हळहळ व्यक्त होत आहे. गरीब परिस्थितीला तोंड देताना गुलफिज्जाच्या परिवाराल हा मोठा हादरलाच बसलाय. वाघोबा नगरला पाणी आहे. परंतु, हाक भर अंतरावर असलेला भास्करनगरमध्ये पाण्याचा एक थेंब ही नाही हे असे का ?असा सवाल स्थानिक नागरिक विचारात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 12, 2016, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading