पाणी वाया घालवण्यापेक्षा आयपीएलचे सामने राज्यात खेळवू नये -मकरंद अनासपुरे

पाणी वाया घालवण्यापेक्षा आयपीएलचे सामने राज्यात खेळवू नये -मकरंद अनासपुरे

  • Share this:

धुळे - 11 एप्रिल : एकीकडे राज्यात भीषण पाणीटंचाई असताना आयपीएलचे सामने राज्यात खेळवण्याची काही गरज नाही अशी भूमिका अभिनेता आणि नाम फाऊंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी मांडली आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं महात्मा फुले वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरण सोहळ्यात ते बोलत होते.makrand_sot

राज्यात पाण्याची भीषण टंचाई असून राज्यात पाण्यासाठी 144 कलम लावण्याची वेळ सरकारवर आली आहे. पाण्यासाठी राज्यभर भटकंती दिसून येत आहे. अशा भीषण परिस्थितीत आयपीएल च्या सामन्यासाठी लाखो लिटर पाणी वाया घालण्यापेक्षा राज्यात सामनेच खेळवू नये अशी स्पष्ट मागणी अनासपुरे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्याबाहेर सामने खेळवले गेले तरी क्रिकेट प्रेमी क्रिकेट सामने पाहणे सोडणार नाही त्यामुळे सामने राज्यात खेळवू नये असं स्पष्ट शब्दात अनासपुरे यांनी सरकारचे कान टोचले आहेत.

मात्र, याच कार्यक्रमात आलेल्या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र विरोधी भूमिका घेत ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी सामने घेण्यास काहीही हरकत नसल्याचं खडसे यांनी सांगितलं. खडसे यांच्या या भूमिकेवरून यावर्षी आयपीएलचे सामने हे राज्यात खेळवले जाणार असल्याचं दिसून येत आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवले तरी चालले पण पाणी देणार नाही अशी भूमिका मांडली होती. तर भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवले तर 100 कोटींचा महसूल बुडेल असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 11, 2016, 9:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading