IBN लोकमत इम्पॅक्ट : अखेर संत कंवरराम धामचं भूमिपूजन रद्द

IBN लोकमत इम्पॅक्ट : अखेर संत कंवरराम धामचं भूमिपूजन रद्द

  • Share this:

amravati_newsअमरावती - 10 एप्रिल : नजीकच्या भानखेडा जंगलात संत कंवरराम धामचं भूमिपूजन अखेर रद्द करण्यात आलंय. संत कंवरराम धामला बांधकाम परवानगी नाही. तर ती जमीन अद्यापही अकृषक करण्यात आलेली नाहीय. ही बातमी आयबीएन लोकमतने दाखवल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनीच याची दखल घेतली. आणि या धामचं भूमिपूजन रद्द झाल्याचं अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितलं.

अमरावती नजिकच्या भानखेडा जंगलात 100 कोटी रुपये खर्च करून विश्वस्तरीय संत कंवरराम धामचे भूमिपूजन आज (रविवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होतं. मात्र, ही जागा अद्यापपर्यंत अकृषक झाली नाहीये. बांधकामाची परवानगीही महसूल विभागाने दिली नाहीये. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावरही आहे. त्यामुळे या जागेवर हे धाम उभारण्यास विरोध वन्यजीव प्रेमींनीही विरोध केला होता. ही बातमी आयबीएन लोकमतनं लाऊन धरल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनीच याची दाखल घेतली. या प्रकरणाच्या चौकशी आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तोपर्यंत या संत कंवरराम धामचे भूमिपूजन रद्द करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2016 01:36 PM IST

ताज्या बातम्या