[wzslider autoplay="true"]
09 एप्रिल : पोलीस, लष्कराचे जवान हे समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र झटत असतात. पण याच सुरक्षा दलातले श्वानही त्यांच्या मानवी मित्रांसाठी मेहनत करत असतात, अशाच एका श्वानाचा काल मुंबईत मृत्यू झाला. मॅक्स असं या पोलिसांच्या लॅब्रेडॉरचं नाव होतं.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताज येथे एक आयईडी आणि हँडग्रेनेड शोधून शेकडो मुंबईकरांचे जीव वाचवणारा मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील मॅक्स या श्वानाचा शुक्रवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला.
ऑक्टोबर 2004 सालचा जन्म असलेल्या मॅक्सला 6 महिन्यांचा असताना पोलीस दलासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. 6 महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ऑक्टोबर, 2005 मध्ये मॅक्स पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात दाखल झाला.
11 जुलै 2006रोजी मुंबईत ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले होते.. त्यावेळीही स्फोटकं शोधून काढण्यात मॅक्सनं मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आपल्या दशकभराच्या सेवेत 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मॅक्सने केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. हॉटेल ताजमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांनी फेकलेले परंतु, स्फोट न झालेला एक आयईडी आणि हँडग्रेनेड शोधण्यात मॅक्सने मदत केली. यामुळे अनेक पत्रकार आणि पोलिसांचे जीव वाचले होते.
मॅक्स मे 2015 मध्ये सेवेतून निवृत्त झाला होता. तेव्हापासून त्याच्या पुढील सांभाळासाठी फिझा शहांकडे सोपवण्यात आला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा