सातार्‍यात गोपाळ समाजाचे जातपंचायत बरखास्त

सातार्‍यात गोपाळ समाजाचे जातपंचायत बरखास्त

  • Share this:

girl-whipped

09 एप्रिल :  सातार्‍यातील 'गोपाळ' समाजाची जात पंचायत बरखास्त करण्यात आली आहे. कराडमध्ये पार पडलेल्या गोपाळ समाजाच्या बैठक हा एतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस)ने सातार्‍यात बर्‍याच दिवसांपासून याबाबतचा पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून, गोपाळ समाजाने समितीच्या सभेत जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला अंनिसचे हमीद दाभोलकरही उपस्थित होते.

भारतीय समाज जातीपातीत अडकल्यामुळेच इतके दिवस देशाचे विकास होऊ शकले नाही. गोपाळ समाजाने जात पंचायतीला तिलांजली देऊन परिवर्त्तनाच्या नव्या बदलाना सामोरी जाण्याचे ठरवून नव्या व्यवस्थेची, नव्या विचार परिवर्त्तनाची गुढी उभारली आहे. त्यामुळे गोपाळ समाजाने घेतलेल्या या ऐतिहासीक निर्णयानंतर अन्य समाज नेमके काय भूमिका घेईल याकडे अंनिसचे लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2016 02:05 PM IST

ताज्या बातम्या