शनी शिंगणापूरनंतर महालक्ष्मी मंदिरातही महिलांचं आंदोलन

शनी शिंगणापूरनंतर महालक्ष्मी मंदिरातही महिलांचं आंदोलन

  • Share this:

Kolhapur banner

कोल्हापूर - 04 एप्रिल :  भूमाता ब्रिगेडच्या महिलांना शनी चौथर्‍यावर प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे सुरू झालेला वाद अद्याप ताजा असतानाच साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या महिलांना रोखल्याची घटना घडली आहे.

भूमाता ब्रिगेडने आंदोलन केल्यावर न्यायालयाने महिलांना प्रवेश द्यावा असा निर्णय दिला. याच निर्णयाच स्वागत करण्यासाठी आज (सोमवारी) सकाळी अवनी संस्थेच्या महिला गाभार्‍यात देवीची पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र या महिलांना श्रीपुजकानी रोखल, एवढचं नाही तर तिथल्या महिला पुजार्‍यांनीही त्यांना गाभार्‍यात प्रवेश करण्यापासून रोखून धरलं. यामुळे अवनी संस्थेच्या महिला कार्यकर्त्याही संतापल्या आणि मंदिरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

दरम्यान, हा सगळा प्रकार सुरू असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमीता घेतली होती. त्यामुळे आम्हाला धक्काबुक्की झाली, असा आरोप अवनी संस्थेच्या महिलांनी केला आहे. तर दुसरीकडे गाभार्‍यात फक्त राजघरण्यातील महिला आणि पुजारी महिलांना प्रवेश दिला जातो, असं श्रीपुजकांनी सांगितलं आहे. कोल्हापूरला पुरोगामी वारसा लाभला आहे. त्यामुळे आता मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेशाचा हा वाद मिटणार की आणखी चिघळणार हे पाहण महत्वाच ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 4, 2016, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading