‘भारत माता की जय’ न म्हणणार्‍यास देशात राहण्याचा अधिकार नाही -मुख्यमंत्री

 ‘भारत माता की जय’ न म्हणणार्‍यास देशात राहण्याचा अधिकार नाही -मुख्यमंत्री

  • Share this:

नाशिक - 02 एप्रिल : 'भारत माता की जय' म्हणणार नाही अशा लोकांना भारतात राहण्याचा अधिकार नाही अशी प्रखर टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे नेते असाउद्दीन ओवेसी यांच्यावर केलीये. तसंच केवळ प्रसिद्धीकरता एकमेकांसमोर उभं राहायचं आणि राज्य सरकारनं पाहात राहायचं असं होणार नाही असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी भूमाता ब्रिगेडला फटकारून काढलंय.

cm_on_bhartmata_ki_jayनाशिकमध्ये भाजपच्या राज्यकार्यकारणीची दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आलीये. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना शिवसेना, एमआयएम आणि भूमाता ब्रिगेडवर परखड टीका केली. भारत माता की जय म्हणणार नाही असा कोणताही कायदा राज्य घटनेत करण्यात आला नाही असं वक्तव्य असाउद्दीन ओवेसी यांनी केलं होतं. त्यावरुन देशात जोरदार वादंग माजलं होतं. आज नाशिकच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यावरही प्रखर टीका केली. भारत माता की जय म्हणणं हे तमाम भारतीयांना मान्य आहे आणि ही त्यांची इच्छा आहे. जर कुणी भारत माता की जय म्हणणार नसेल तर त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा आज गाजलेल्या भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनाकडे वळवला. हायकोर्टाने दिलेले आदेशाचं काटेकोटरपणे पालन केलं जाईल. प्रत्येक महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. पण, कुणी प्रसिद्धीसाठी राज्याच्या कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असले तर ते खपवून घेतलं जाणार नाही. केवळ प्रसिद्धीकरता एकमेकांसमोर उभं राहायचं आणि राज्य सरकारनं पहात राहायचं असं होणार नाही असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

वेगळ्या विदर्भाच्या मुद्याबरोबरच श्रीहरी अणेंनी वेगळ्या मराठवाड्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली. आजपर्यंत विदर्भ, मराठवाड्यावर अन्यायच झाला. जोपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाचा विकास होत नाही तोवर महाराष्ट्राचा विकास होणार नाही. पण, काही लोकं मराठवाड्याला पाणी द्या अशी मागणी करता आणि मराठवाड्यात जाऊन वेगळी मागणी करायता हे कसं सहन करायचं असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या सभेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. एवढंच नाहीतर मराठवाड्याला पाणी द्यायला उत्तर महाराष्ट्रातल्या शिवसेनेतल्या नेत्यांनी केलेल्या विरोधाचा संदर्भही मुख्यमंत्र्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2016 10:33 PM IST

ताज्या बातम्या