शनी चौथर्‍यापासून 'भूमाता'ला रोखलं

शनी चौथर्‍यापासून 'भूमाता'ला रोखलं

  • Share this:

shani_mandir_desaiअहमदनगर - 02 एप्रिल : हायकोर्टाच्या आदेशानंतर शनी चौथर्‍यावर जाण्यासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकार्यांना पोलिसांनी रोखलं. चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न करणार्‍या तृप्ती देसाई आणि गावकर्‍यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.

तृप्ती देसाईंसह त्यांच्या सहकार्यांना पोलिसांनी शनी मंदिराच्या परिसरातून बाहेर काढलंय. गावकर्‍यांचा आक्रोशामुळे पोलिसांनी तृप्ती देसाईंना ताब्यात घेतलंय. कोर्टाच्या आदेशानंतरही आम्हाला चौथर्‍यावर जाऊ दिलं नाही हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणारा असा आक्रमक पवित्रा तृप्ती देसाई यांनी घेतलाय.

शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात हायकोर्टाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सर्वांना मंदिरात प्रवेशाचा अधिकार आहे आणि याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. कोर्टाच्या या निर्णयानंतर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेणार अशी गर्जना केली. त्यानुसार, तृप्ती देसाई आज सकाळीच पुण्याहून शिंगणापूरला निघाल्या होत्या.

दुपारी शिंगणापूरमध्ये पोहचल्यानंतर गावकर्‍यांनी त्यांच्या ताफ्याला अडवलं. तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकार्‍यांनी चौथार्‍यावर जाण्याचा प्रयत्न केला पण गावकर्‍यांनी त्यांना जाऊ दिलं. कोणत्याही परिस्थिती चौथर्‍यावर जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकर्‍यांनी घेतला. गावकरी आणि भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यामध्ये एकच गोंधळ उडाला होता.

तरीही देसाई आणि त्यांच्या सहकार्‍यांनी चौथर्‍यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकरी आणि भूमाता ब्रिगेडमध्ये एकच धुमश्चक्री उडाली. देसाई यांनी धक्काबुक्की झाल्याचा आरोपही केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत तृप्ती देसाईंसह त्यांच्या सहकार्यांना मंदिर परिसराच्या बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं.

हायकोर्टाच्या आदेशानंतही पोलिसांना आम्हाला का अडवलं. हा कोर्टाचा अवमान आहे. पोलिसांनी संरक्षण देऊन आम्हाला चौथर्‍यावर जाऊ दिलं पाहिजे होतं. पण, तसं घडलं नाही. पोलिसांनी आम्हाला रोखलं हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अपयश असून त्यांना राजीनामा द्यावा अशी मागणी देसाई यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2016 04:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading